मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणे
नमस्कार !
ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या (MBVMM) वतीने आपणा सर्वांशी संवाद साधताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. साधारण 27 वर्षांपूर्वी पुण्यातील लक्ष्मी रोडवरील ‘ श्रीपाद करमरकर ‘ नावाच्या एका ब्राह्मण कापड व्यावसायिकानं एक स्वप्न पाहिलं; ब्राह्मण व्यावसायिकांच्या एकत्रीकरणाचं! आपल्या व्यावसायिक ज्ञाती बांधवांसमोर त्यानी ब्राह्मण व्यावसायिकांच्या स्नेहसंमेलनाची कल्पना मांडली, सर्वांनी ती कल्पना उचलून धरली आणि तेंव्हापासून ब्राह्मण व्यावसायिक संमेलनाची सुरवात झाली.

